पुण्यातील व्यापाऱ्याला लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड; म्हसवड पोलिसांची १२ तासांत 'धडाकेबाज' कामगिरी

  म्हसवड :पुणे आणि मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून, मारहाण करत लुटणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा म्हसवड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, तिन्ही आरोपींना अटक करून २२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



​नेमकी घटना काय?

​पुण्यातील 'आर.के. ड्रीप अँड मल्चिंग प्रोडक्शन' या कंपनीला अज्ञात व्यक्तीने ठिबक सिंचन पाईप्सची मोठी ऑर्डर दिली होती. हा माल घेऊन तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ (रा. रांजणी, ता. आंबेगाव) हे पिकअप गाडीने म्हसवड येथे आले होते.

​आरोपींनी त्यांना म्हसवड-माळशिरस रोडवरील भाटकी गावच्या माळरानावर बोलावले. तिथे बुलेटवरून आलेल्या दोन आरोपींनी वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्याला गाडीतून ओढून काढले. त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि सर्व माल दुसऱ्या एका पिकअप गाडीत भरून पोबारा केला.

​तपासाची चक्रे फिरली आणि आरोपी जाळ्यात

​घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत सोलापूर जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...