राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये सायन्स डे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वदंन करून अत्यंत उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विज्ञान प्रदर्शनात शाळेतील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मन जिंकले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, जिज्ञासा वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता. विशेष म्हणजे इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने प्रयोग तयार करून ते आत्मविश्वासाने इंग्रजीतून सादर केले. विद्यार्थ्यांचे प्रभावी सादरीकरण पाहून उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडवणाऱ्या शाळेचे भरभरून कौतुक केले.
या विज्ञान प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रयोग सादर केले. श्रुतिका रेवणवार हिने पाणी शुद्धीकरण कसे करावे हा प्रयोग करून पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया दाखवली. भक्ती शिवसांब कोरे हिने पाण्याचे चक्र (Water Cycle) या प्रयोगाद्वारे पाण्याची नैसर्गिक प्रक्रिया समजावून सांगितली. अनया गणेश तागबिडे हिने चंद्राचे टप्पे या प्रयोगाद्वारे चंद्राच्या कलांचे सुंदर सादरीकरण केले.
तसेच राजवीर ओंकार कोरे याने हवेला वजन असते हे प्रयोगातून सिद्ध करून दाखवले, त
र भूमी चव्हाण हिने ज्वालामुखीचा प्रयोग सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. रिया फुलवरे, वेदश्री पवार आणि सिरत शेख यांनी ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हा प्रयोग प्रभावीपणे सादर केला तर विश्व सावरगावकर ज्वलनास ऑक्सिजन ची गरज असते.भरत मुंडे
चुंबकाचे प्रयोग तर शाक्यकुमार वाघमारे याने अतिशय भव्य असा हवा शुद्धीकरण कारखाना केला. अमेय तापडिया याने चुंबकाचे विविध प्रयोग दाखवले, तर भरत मुंडे याने प्रकाश संश्लेषण हा प्रयोग सादर केला. रमण हाके ( चंद्रयान)
हिंदवी जाधव & कामाक्षा कदम(Amezing fresh water,,
, गार्गी कटकमवार(invisible ink), वेदिका पवार(cooler), ऋतुजा जाधव(energy effect on water), श्वेता जाधव, जान्हवी देशमुख ( volcanoes), अयोध्या सूर्यवंशीऋतुजा जाधव&वेदिका पवार (water cycle),
श्रेया कोल्हे, श्रेया शिंदे(pollution free Village &City)
, राजनंदिणी नांदूरे(Nutralization reaction), पवन केंद्रे & कृष्णा वाघमोडे(Statics force),
जानवी गजानन डामरे( वेस्ट मॅनेजमेंट) भाग्यश्री हाके (Microscope) यासह अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर करून विज्ञानावरील आपली जिज्ञासा आणि कल्पकता प्रदर्शित केली.
या प्रसंगी प्राथमिक सायन्स विभाग प्रमुख फिजा मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकांमध्ये वाचण्याचा विषय नाही, तर तो प्रयोगातून अनुभवण्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून विज्ञान समजून घेतले तर त्यांची जिज्ञासा आणि आत्मविश्वास अधिक वाढतो. आज विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग पाहून त्यांच्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा आम्हाला अभिमान वाटतो.”
माध्यमिक सायन्स विभाग प्रमुख सौ. अंधुरे मॅडम यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या की माध्यमिक मुख्याध्यापक सौ.स्वामी मॅडम यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजन करा असे मला सांगितलं त्या प्रमाणे मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले म्हणून विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग व कल्पक मॉडेल्स सादर करून आपली वैज्ञानिक जिज्ञासा दाखवून दिली.
विद्यार्थ्यांची मेहनत, नाविन्यपूर्ण विचार आणि आत्मविश्वास पाहून अत्यंत अभिमान वाटतो.
सुशील राठोड सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,
“लहान वयातच विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण झाली तर विद्यार्थी मोठे होऊन समाजासाठी उपयुक्त संशोधक, वैज्ञानिक आणि नवोपक्रम करणारे नागरिक बनू शकतात. आज या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिज्ञासा, मेहनत आणि आत्मविश्वास खरोखर प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल जोसेफ शेविंयार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमच्या शाळेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणासोबतच प्रयोग, उपक्रम आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. आज विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग आणि त्यांचे इंग्रजीतील आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण हे शाळेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.बंडेवाड रोकडोबा सर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,
सायन्स डे निमित्त विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिज्ञासा, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कूल, राणीसावरगाव ही शाळा विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.


Post a Comment