⚡ ब्रेकिंग News

साखरेच्या गोडीतून होळीचा आनंद; पेठवडज शाळेचा संस्कारमय उपक्रम मुख्याध्यापक युसुफ शेख यांचा स्तुत्य पुढाकार; विद्यार्थ्यांना साखरेचे हार

 पेठवडज (अशोक पाटील तेलंग)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी पेठवडज येथील मुख्याध्यापक श्री. युसुफ शेख यांनी शिमग्या निमित्त होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. होळी सणाचे औचित्य साधत त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना साखरेचे हार देऊन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.

भारतीय संस्कृतीत होळी हा रंगांचा, एकोप्याचा आणि आनंदाचा सण मानला जातो. ग्रामीण भागात शिमग्याच्या रूपात साजऱ्या होणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सणाची गोडी वाढावी, आपुलकीची भावना दृढ व्हावी आणि शाळा ही केवळ शिक्षणाचीच नव्हे तर संस्कारांचीही केंद्रे आहेत, हा संदेश देण्यासाठी मुख्याध्यापक शेख सर यांनी पुढाकार घेतला. सर्व विद्यार्थ्यांना साखरेचे हार देण्यात आले. साखरेच्या हारांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सणाची परंपरा समजून घेण्याची संधी मिळाली, तसेच सण साजरा करण्याचा आनंदही अनुभवता आला.

या उपक्रमात शाळेतील इतर शिक्षकांचा देखील सक्रिय सहभाग होता. सौ. शेख रेश्मा युसूफ, सौ. रेगुडे संगीता दत्तात्रय व सौ. सत्तारी रेहाना इरशाद यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात व अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली. सर्व शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी सण अधिक संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना होळी सणाचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. सण साजरा करताना सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि एकोप्याचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. आनंद पाटील दामले यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेत अशा प्रकारचे संस्कारक्षम आणि आनंददायी उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्याध्यापक श्री. युसुफ शेख यांच्या पुढाकारामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी पेठवडज ही शाळा परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबत सांस्कृतिक परंपरांनाही दिले जाणारे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...