कंधार (अशोक पाटील तेलंग)
आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) या सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय विचारांवर कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने सन २०२६ चा राज्यस्तरीय “शिवछत्रपती पुरस्कार” आदर्श उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यकांत शांताबाई लक्ष्मणराव वाघमारे (बारुळ ता. कंधार, जि. नांदेड) यांना जाहीर करण्यात आला आहे.
संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील (राजू) यांनी अधिकृत निवडपत्राद्वारे ही घोषणा करताना वाघमारे यांच्या पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक भान आणि निर्भीड लेखणीची दखल घेतली असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय देत समाजजागृतीचे कार्य सातत्याने पार पाडल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
या पुरस्कारामुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याची व्यापक पातळीवर दखल घेतली जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता हरिकेश लॉन्स बँकेट हॉल, दौलत शाळेजवळ, दाभाडी रोड, मालेगाव कॅम्प, जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
सूर्यकांत वाघमारे यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.


إرسال تعليق